किरण वाघमारे खुनी हल्ला करणार्यांना तात्काळ अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे “आंदोलनाचा वंचित चां इशारा”

0
36

बीड  प्रतिनिधी :  वंचित बहुजन आघाडी चे बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांच्यावर दिं. २६ जुनं रोजी आर.टी.ओ. कार्यालया समोर काही जणांनी खुणी हल्ला केला होता. त्याची रितसर फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन ला देण्यात येवुन संबंधीत आरोपींवर खुणी हल्ला व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.त्याचा तपास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला. घटना घडुन दिड महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरीही आरोपीला अटक करण्यात आली नाही.आरोपी उजळ माथ्याने शहरात फिरत आहेत.पोलीसच त्यांना संरक्षण देतात असाआरोप वंचित घ्या वतीने करण्यात आला
आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा दिं १०ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. शिष्टमंडळाचे नेत्तृत्व मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, डॉ.नितीन सोनवणे,बबनराव वडमारे, ज्ञानेश्वर कवठेकर पुरूषोत्तम वीर,अनुरथ वीर,युनुस शेख, अजय सरवदे, बालाजी जगतकर, डॉ.गणेश खेमाडे,प्रशांत ससाणे,श्रीकांत वाघमारे, पुष्पाताई तुरुकमारे राजेशकुमार जोगदंड सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here