लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमाप यांचा शाहिरी कार्यक्रम

0
42

बीड प्रतिनिधी – प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी आ.संदीप क्षीरसागर यांच्या आयोजनातून लोकशाहिर, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे 102 व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहिर नंदेश उमाप यांच्या ‘वंदितो लोकशाहिरा’ शाहिरी कार्यक्रम बीड शहरात आयोजित करण्यात आला आहे.
साहित्यरतन लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची ही 102 वी जयंती असून त्या निमित्त बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहिर नंदेश उमाप यांचा शाहीरी कार्यक्रम बीड शहरातील माँ वैष्णोदेवी पॅलेस या ठिकाणी आज दि.31 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे प्रमुख तथा आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, वैजीनाथ तांदळे, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण आखाडे, उपाध्यक्ष पंकज चांदणे, अशोक वाघमारे, हनुमंत वाघमारे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here