शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर आणि ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशावरच पुढील वाटचाल्र कुंडलिक खांडे

0
35

बीड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी कार्यरत राहू – कुंडलिक खांडे

शिंदे साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-कुंडलिक खांडे

बीड  प्रतिनिधी -शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना जो स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला होता आणि धर्मवीर स्व.आनंदजी दिघे साहेबांनी जे हिंदुत्वासाठी लढण्याचा बाणा दिला त्यानुसारच मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशावरच आपली पुढील वाटचाल राहणार असून शिंदे साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नुतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले.बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी संपुर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी जेष्ठ कडवट शिवसैनिक तथा जिल्हा समन्वयक जयसिंग मामा चुंगडे, जिल्हा संघटक भरत जाधव, उपजिल्हाप्रमुख एजाज शेख, उपजिल्हाप्रमुख सिराज शेख,शहर प्रमुख शिनुभाऊ बेदरे, टायगर गु्रपचे अविनाश जाधव, तालूका प्रमुख राहुल चौरे, दिनेश पवार, उपशहरप्रमुख कामरान शेख, उपशहरप्रमुख कल्याण कवचट, उपतालुका प्रमुख संतोष घुमरे, देवराव आबा घोडके,संदीप सोनवणे, युवा नेते कृष्णा फरताळे, राहुल साळुंके, सुरज चुंगडे, साहिल देशमुख, विभागप्रमुख राजाभाऊ नवले, उपविभागप्रमुख रंजीत कदम, युवा सेना उपतालुकाप्रमुख विक्की जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्काराला उत्तर देताना कुंडलिक खांडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारुन आपण केवळ 15 वर्षाचे असताना शिवसैनिक म्हणून सामाजिक जीवनाला प्रारंभ केला होता. तेव्हा पासून आजपर्यंत या 20 वर्षाच्या काळात आपण पक्षाने दिलेल्या आदेशावरच ग्राम पंचायत पासून ते विधानसभा,लोकसभा पर्यंत अहोरात्र कष्ट घेतले. शिवसैनिकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या सुख-दु:खात कायम सहभागी राहिलोत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कायम माझ्यावर आशिर्वादाचा हात ठेवला. त्यांच्या आदेशाप्रमाणेच यापुढची वाटचाल राहणार आहे. शिंदे साहेबांनी जिल्हाप्रमुखपदाची दिलेली जबाबदारी आपण अत्यंत निष्ठेने आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या कार्यावर आपला भर असेल. येणार्या काळात होणार्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगर पालिका निवडणूकीसाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे. आपली शक्ती दाखवून देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी कोरोना काळात बीड जिल्ह्यासाठी खुप मदत केलेली आहे. अनेक विकासकामांसाठी निधी देण्यासाठी शिंदे साहेबांनी नेहमीच मोकळा हात सोडलेला आहे. हिंदुत्वासाठी आणि स्वाभिमानासाठी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.आतापर्यंत ग्रामीण तसेच शहरी भागातील तमाम जुन्या,नव्या शिवसैनिकांनी साथ दिलेली आहे. यापुढे आपली साथ कायम माझ्या सोबत राहू द्या असे आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले.
या कार्यक्रमाला सरपंच लहू खांडे, रामा बांड,रमेश शिंदे,प्रदिप शिंदे, गणेश घोडके,गोरख घोडके,चंद्रकांत घोडके,भगवान यादव,खाँजा भाई शेख,सरपंच वैजिनाथ नेवाळे, सरपंच रामहरी हाडुळे, रमेश शिंदे,गजानन शिंदे, सखाराम हुरकुडे तसेच बीड जिल्हयातील विविध भागातून शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here