गायकवाड यांच्या रूपाने योगेश पर्वला मोठी ताकद -डॉ.योगेश क्षीरसागर

0
36

आसाराम गायकवाडांच्या पाठिंब्यामुळे पेठ बीडच्या बालेकिल्ल्याला बळकटी

लवकरच माजीमंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा

बीड :  मतदार संघाचे आ संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आसाराम भाऊ गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेठ बीड भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे.

यावेळी आसाराम भाऊ गायकवाड यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत काम करत असताना विकास कामे पूर्ण न झाल्यामुळे आपण विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली योगेश पर्व बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा जोमाने काम करणार असून येणाऱ्या काळात बीड नगर पालिका पुन्हा एकदा ताब्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड यांचा हा प्रवेश म्हणजे पुनर्रगृह प्रवेश होणार आहे.आसाराम भाऊ गायकवाड यांच्यामुळे पेठ बीड भागात ताकद वाढली आहे. पेठ बीड भागाने स्व.काकू नानांच्या काळापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील आम्हाला मदत केली आहे. आसाराम गायकवाड यांना विरोधकांसोबत काम करत असताना वाईट अनुभव आल्यामुळेच त्यांनी योगेश पर्वला सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर म्हणाले की, आसाराम भाऊ गायकवाड यांच्या रूपाने
पेठ बीड भागात मोठी ताकद आमच्या सोबत आली आहे. आसाराम भाऊ गायकवाड यांनी विकास कामांच्या मुद्यावर आमच्याकडे प्रवेश केला असल्याने त्यांना नक्कीच याची प्रचिती येईल. ग्रामीण भागात आणि बीड शहरात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. काही दिवसात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आसाराम आसाराम भाऊ गायकवाड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here