सोलापूर-गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात  

0
33
 35 प्रवासी जखमी; ट्रॉमा केअर सेंटर रखडल्यानं रुग्णांची होतेय गैरसोय

सोलापूर – गाणगापूर एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास  अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली. या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 35  प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर असल्याची देखील माहिती आहे. यातील काही रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात देखील हलविण्यात येत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here