लोकनेत्या पंकजाताई मुंडेंनी ओबीसी आरक्षणाचा लढा तेवत ठेवला- ॲड. सर्जेराव तांदळे

0
35

शिंदे – फडणवीस सरकारच्या प्रबळ ईच्छाशक्ती मुळे ओबीसी आरक्षण लागू..!

बीड प्रतिनिधी:  आघाडी सरकारने घालवलेले ओबीसी आरक्षण  पुन्हा लागू व्हावे यासाठी राज्यभर  ओबीसी समाजाचा संघर्ष चालू होता. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे, समाजाचे भवितव्य अंधारमय झाले होते. काही निवडणुका मध्ये ओबीसी समाजाला संधी गमवावी लागली. राज्यभर ओबीसींचा संताप असूनही आघाडी सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी हा लढा सातत्याने तेवत ठेवला. खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा वेळोवेळी लावून धरला. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर शिंदे – फडणवीस सरकारने प्रबळ इच्छा शक्ती ठेऊन काटेकोरपणे लढा दिला. म्हणूनच आज ओबीसी समाजाला न्याय मिळाला. असे  मत भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे यांनी व्यक्त केले.

राजश्री शाहू जयंती 2021 रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व जाती धर्मातील नेते, कार्यकर्ते यांनी समर्थन देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले आहे. मराठा, मुस्लीम,धनगर, समाजाला न्याय हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसी समाजाचे समर्थन आणि सहकार्य राहील. असा विश्वास तांदळे यांनी ओबीसी आरक्षण  निर्णय आनंदोत्सव दरम्यान व्यक्त केला.

काल सर्वोच्च न्यायालयांने ऐतिहासिक निर्णय घेऊन  ओबीसी समाजाला न्याय दिला. या निर्णयाचा आनंद उत्सव आणि शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्यासाठी आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस ॲड. सर्जेराव तांदळे,नवनाथ अण्णा शिराळे, सलीम जहांगीर, भगीरथ बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी-. प्रा, देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, अजय सवाई, लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, सुभाष धस, शिवाजी मुंडे, शांतीनाथ डोरले, गणेश पुजारी, संग्राम बांगर, कपिल सौदा, विलास बामणे, हरीश खाडे,  प्रा. सचिन उबाळे, मनोज ठाणगे, संजय मुंडे, नंदू वनवे, विनोद जायभाय, सुनील मिसाळ, संतोष राख, योगेश भागवत, बाबुराव खाडे, अमोल वडतिले, संतोष गवळी, नितीन फड, डॉ. जयश्री मुंडे, मीरा गांधले, संगीता धसे, छाया मिसाळ, संध्या राजपूत, संजीवनी राऊत, लता बुंदेले, प्रीत कुकडेजा, शीतल, राजपूत, लता राऊत, समर्थ तांदळे, विशाल खाडे, शिवाजीराव नागरगोजे, दत्ता परळकर, शेख नईम, ऋषी फुंदे, अम्मू जाहगीरदार, राजेश चरखा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here