आ. सुरेश धस हे विकासाला लागलेली किड आहे-आ. बाळासाहेब आजबे

0
31

आष्टी मतदार संघाच्या विकासासाठी आ. बाळासाहेब आजबे आक्रमक

प्रारंभ न्युज

आष्टी : आष्टीची कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे ती ओळख कायम स्वरुपी पुसणारी योजना, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना,अनेक पंचवार्षिक निवडणूकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा तसेच तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे उजणी ते खुंटेफळ उपसा सिंचन योजना होती. परंतू ही योजना स्थगित झाल्यामुळे आ. बाळासाहेब आजबे आक्रमक झाल्याचे दिसले. आज (ता. १७) येथील पञकार परिषदेत आ. आजबे यांनी थेट आ.सुरेश धस यांच्यावर निशाना साधला. आ. सुरेश धस हे विकासाला लागलेली किड असलेल्याचे मत आ. आजबे यांनी व्यक्त केले.

३० जुन रोजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आंतर्गत थेट उजणी ते खुंटेफळ उपसा सिंचन योजनेसाठी एकुण 1468 कोटी मंजूर करून आणल्याने आष्टी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल तेव्हा आष्टी तालुक्यातील जनतेने एकच जल्लोश करीत आमदार बाळासाहेब आजबे यांचे स्वागत करुन आभार मानले होते,एका सत्कार प्रसंगी मिरवणुकीत आमदार बाळासाहेब आजबे यांचा दंड थोपटतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता नेमका तो फोटो आणि योजने साठी एवढा पैसा मंजुर करुन आणल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांचा तालुक्यातील जनतेने केलेला सत्कार आमदार सुरेश धस यांना आवडला नसल्याची कुजबुज जनतेत एकायला मिळत होती नेमकी तिथेच माशी शिंकली की काय म्हणून आमदार बाळासाहेब आजबे यांनी मंजूर करुन आणलेल्या ह्या योजनाला आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्यामुळे ह्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे आसा आरोप आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.आमदार सुरेश धस हे जाणून बुजून तालुक्याच्या विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा आत्तापर्यंत पर्यंत माझा अनुभव आहे आणि
सुरेश धस हे तालुक्याच्या विकासाला लागलेली किड आहे असा घनाघाती आरोप देखील यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here