शंभर कोटींच्या निधीवरुन मुंडे बहिण-भावात श्रेयवाद

0
36

परळी येथील उड्डाणपुलासह इतर विकासकामांसाठी 100 कोटीचा निधी आम्हीच आणल्याचा दोघांचाही दावा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : केंद्रीय मंत्रालयाने परळीतील विकासकामांसाठी  100 कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आमच्यामुळेच मंजूर झाला आहे. निधीचे श्रेय घेण्यासाठी आता मुंडे बहिण-भावात जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला.

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत. निधी कोणीही आणला असो, जो निधी आला आहे. त्या निधीचा योग्य वापर करुन दर्जेदार कामे करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे यांचे ट्वीट
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here