दोन वर्ष खंड पडल्यामुळे यावर्षी आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोव्हीडमुळे गेल्या दोन वर्षापासून आषाढी वारीला खंड पडला होता. सध्या कोरोना आटोक्यात आल्यामुळे ही आषाढी उत्साहात साजरी करण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (ता. 24) शहरात
श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आगमन, यावेळी शहरकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. यावेळी युवानेते डॉ योगेश क्षीरसागर, डॉ सारिका क्षीरसागर आणि प्राचार्या दिपाताई क्षीरसागर या कुटुंबीयांनी संत मुक्ताबाई चे दर्शन घेऊन पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अल्पोपहार देऊन स्वागत केले. मुक्ताबाईची पालखी दोन दिवस बीड मध्ये मुक्कामी असणार आहे. पालखी शहरात आल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे प्रस्थान तीन जुनला झाले होते. यानंतर मुक्ताबाई पालखीचे आज शहरात आगमन झाले . यावेळी बीडकरांच्या वतिने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील सुभाष रोड परिसरात पालखी रिंगण करण्यात आले होते. यावेळी महिलांनी फुगडी खेळत हा आनंद साजरा केला. यावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मुक्ताबाईची पालखी आज शहरातील माळवेस येथील हनुमान मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. तसेच ही पालखी शहरातील बालाजी मंदिर येथे मुक्कामी असणार आहे. गेल्या दोन वर्ष कोरोना असल्यामुळे आषाढी वारी झाली नव्हती, यामुळे येणारी आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.