Beed : बीडच्या दोन्हीही शिवसेना जिल्हाप्रमुखांचा हा निर्णय!

0
28

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत –  अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसैनिक मात्र आक्रमक झाले. तसेच अनेक जिल्ह्यातील नेते शिंदे गटाला पाठींबा देत आहेत. यामुळे बीड मधील शिवसेना कोणाची ? हा प्रश्‍न उपस्थित होत होता. परंतू बीड जिल्ह्यातील दोन्हीही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी आप-आपली भुमिका स्पष्ट करत, आम्ही हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक असून आम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे मत व्यक्त केले.  तसेच आज मुंबईत बोलावलेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीस जिल्ह्यातील दोन्हीही जिल्हाप्रमुख उपस्थित आहेत.  

मराठवाडयातील अनेक आमदार शिंदे गटाकडे गेल्यामुळे बीडची शिवसेना कोणाची हा प्रश्‍न उपस्थित होत होता. यामुळे प्रारंभने दोन्हीही जिल्हा प्रमुख यांच्याशी संपर्क करुन त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप व शिवसेना जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून तो जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आज हे दोन्हीही जिल्हा प्रमुख मुख्यमंत्री यांनी बोलावलेल्या जिल्हा प्रमुख यांच्या बैठकीस उपस्थित आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की, बीड जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागार व गेवराई मतदार संघातील माजी आमदार बदामराव  पंडित यांचे मत मात्र समजू शकले नाही. यामुळे त्यांच्या भुमिकेकडे  सुद्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here