पंकजा मुंडे यांचा मार्ग मोकळा तर आ.मेटेंसाठी कठीण

0
29
पंकजा मुंडे, चित्रा वाघ, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांची नावे आघाडीवर
राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडेंना आमदार करुन पक्ष देणार बळप्रारंभ वृत्तसेवा

बीड : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होत आहे. यात भाजपाचे चार आमदार निवडूण येणार आहेत. यात भाजपाकडून आघाडीवर असलेले नाव म्हणजे राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यासह भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची नावे आहेत. तसेच कायम विधानपरिषदेचे आमदार असणारे आमदार विनायक मेटे यांना मात्र यावेळेस विधानपरिषदेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आ. मेटे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले असल्यामुळे आ.मेटेंना वेळ आली तर परत संधी मिळू शकते. परंतु सध्या तरी त्यांना डावल्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळेस विधानपरिषदेवर संधी मिळणार असून असे झाले तर येणाऱ्या 2024 च्या विधानसभेसाठी फायद्याचे ठरेल.

विधानपरिषदेवरील नऊ आमदार निवृत्त होत असून यात आ.सुरजीतसिंह ठाकूर, आ.प्रसाद लाड, आ.विनायक मेटे, आ.सदाभाऊ खोत, आ.प्रविण दरेकर, आ.संजय दौड, आ. रामराजे नाईक, आ. दिवाकर रावते, आ. सुभाष देसाई या आमदारांचा समावेश आहे. पुर्वीची एक जागा रिक्त असून एकूण दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. यात भाजपाचे चार, राष्ट्रीवादीचे दोन, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचे दोन आमदार निवडूण येणार आहेत. राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळेस पक्ष बळ देणार आहे. सध्या त्यांच्या नावाला भाजपामध्ये सर्वात जास्त पसंती मिळत आहे. जर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले तर भविष्यात त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण अडीच वर्षावर विधानसभेचे निवडणूका होणार आहेत. याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांना आता तयारी करावी लागणार आहे. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळे त्यांना 2024 साठी विशेष तयारी करावी लागणार आहे. यासह कायम विधानपरिषदेचे आमदार असणारे विनायक मेटे यांना मात्र यावेळेस विधानपरिषदेची जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. यावेळेस विधानपरिषदेची जागा मागणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपाच्या वतिने राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे, विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ व आ. प्रसाद लाड यांची नावे आघाडीवर आहेत. यामुळे या चार जागेत आपले स्थान कायम ठेवण्यासाठी आमदार विनायक मेटे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

आमदार मेटेंनी जिल्ह्यात जास्त लक्ष देण्याची गरज

सर्व सामान्य परिवारातुन पुढे येत आ.विनायक मेटे यांनी त्यांची राज्यात व देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकांची कामे त्यांनी आज पर्यंत मार्गी लावलेली आहेत. यामुळेच त्यांना आज पर्यंत विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. परंतु त्यांना आज पर्यंत पुढचे यश प्राप्त करता आलेले नाही. यामुळे भविष्यात आपली एक ताकद निर्माण करण्यासाठी आ.मेटेंना बीड जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या आ.मेटे महिन्यातील दहा दिवस बीड मध्ये असतात तर 20 दिवस मुंबईत असतात. यामुळे त्यांना यापुढे जिल्ह्यात जास्त दिवस राहून येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने विशेष तयारी करावी लागणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here