Beed: अद्ययावत हायड्रोलीक ब्लूमर मशिन्स गेल्या कुठे?

0
35

5 जानेवारी 2022 ला माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते झाले होते लोकार्पण
शहरातील धुळी मुळे शहरकरांचे प्रंचड हाल; लाखो रुपये खर्च करुन सुद्धा त्याचा फायदा होईना

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :  बीड शहर वासीयांच्या मागणीनुसार बीड शहर स्वच्छ व धुळमुक्त करण्यासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून 3 अद्ययावत हायड्रोलीक ब्लूमर मशिन्स जानेवारी 2022 मध्ये खरेदी करण्यात आल्या होत्या. याचे लोकार्पण 05 जानेवारी 2022 मध्ये  नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु नंतर ह्या मशिन्स नेमक्या कुठे गेल्या, कारण शहरातील रस्त्यावरील धुळ तर आहे तशीच आहे. मग लाखो रुपयांचा खर्च नेमका कशासाठी करण्यात आला. ज्या मशिन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्या फक्त फोटो काढण्यासाठी होत्या का? बीड शहरातील नागरीकांना अजून किती वर्ष धुळीचा सामना करावा लागणार आहे. सध्या बीड शहरातील सर्वच महत्वांच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण झाली असून याचा त्रास शहरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

बीड शहरातील रस्त्यांवरील धूळ पूर्णपणे नाहीशी व्हावी व शहरातील रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी नगर परिषद स्वच्छता समितीच्या वतीने आवश्‍यक ते सर्व प्रयत्न भविष्यातही करण्यात येतील असे मत माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी व्यक्त केले होते. गेल्या चार महिन्यापुर्वी बीड नगर पालिकेने तीन अद्ययावत हायड्ोलीक ब्लूमर मशिन्सची खरेदी केली होती. या मशिन्स शहरातील धुळ साफ करणार होत्या. यामुळे  बीड शहर धुळमुक्त होईल अशी आशा सर्वांना होती. परंतु पाच जानेवारी 2022 ला  यातील एका मशिन्सचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते झाल्यानंतर ह्या मशिन्स परत नागरीकांना दिसल्याच नाहीत. नगर पालिकेच्या वतिने लाखो रुपये खर्च करुन शहरातील धुळ साफ करण्यासाठी हायड्रोलीक ब्लूमर मशिन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. परंतु आज पर्यंत या मशिन्सचा बीडकरांना काहीच फायदा झाला नाही. मग या मशिन्स फक्त फोटो काढण्यासाठीच होत्या का? असा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here