बाळासाहेब कारगुडेंनी हॉटेल व्यवसायातील यशस्वी भरारी नंतर बँकींग क्षेत्रात केले पदार्पण

0
49
बी.व्ही.एम बळीराजा अर्बन निधी लि. चा जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभ दिनी होणार शुभारंभ
-हाताला मिळेल ते काम करत मिळवले यश; युवा उद्योजक बाळासाहेब कारगुडेंनी दिला अनेकांना रोजगार
हॉटेल बळीराजाला ग्राहकांचा भरभरुन मिळतोय प्रतिसाद; बी.व्ही.एम बळीराजा अर्बन निधी लि.च्या माध्यमातुन युवकांना सक्षम करणार!प्रारंभ वृत्तसेवा

बीड : प्रत्येकाच्या वाट्याला छोटा किंवा मोठा संघर्ष आलेला असतो, कुणाच्या वाट्याला छोटा संघर्ष असतो तर कुणाच्या वाट्याला मोठा संघर्ष असतो. ज्यांना मोठा संघर्ष करावा लागतो, त्यांना यश सुद्धा मोठेच मिळत असते. बाळासाहेब कारगुडे यांना सुद्धा मोठ्या संघर्षचा सामना करावा लागला आहे. त्यांचा जन्म एका सर्व सामान्य परिवारात  झाला. आई वडील यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आई वडील ऊसतोडणीचे काम करत होते. यासर्व वातावरणात बाळासाहेब कारगुडे यांनी त्यांचे शिक्षण आई वडीलांना कामात मदत करत पुर्ण केले. यानंतर त्यांनी नौकरीसाठी सुद्धा प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. यामुळे त्यांनी हाताला मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी भाजी पाला विकणे, बीड ते केज प्रवासी वाहतुक करणे, चहाचे हॉटेल यासह इतर कामे करत परिवाराला साथ दिली. यानंतर त्यांनी कर्झणी फाटा या ठिकाणी बळीराजा या हॉटेलची सुरुवात केली. यावेळी त्यांना व्यवसायासाठी पैसे नसल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी या सर्व अडचणींचा सामना करत हॉटेल व्यवसायात आज भरारी घेतली आहे. व्यवसायातील जिद्द, चिकाटी, मेहनत, कठोर परिश्रमाच्या बळावर युवा उद्योजक बाळासाहेब कारगुडे यांनी हॉटेल व्यवसायात यश संपादन केल्यानंतर आता ते बँकींग क्षेत्रात बी.व्ही.एम.बळीराजा अर्बन निधी लि. च्या माध्यमातुन 12 जानेवारी 2022 ला जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभदिनी पदार्पण करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस प्रारंभ परिवाराकडून त्यांना भरभरुन शुभेच्छा…!

कठोर महेनतीच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतेच…!

सर्व सामान्य परिवारातील बाळासाहेब कारगुडे जिद्दीच्या बळावर, जवळ भांडवल नसतानाही बाळासाहेब कारगुडे  यांनी 2006 ला हॉटेल बळीराजा या छोट्या रोपट्याची सुरुवात केली. आज 17 वर्षांनी हे एक छोटे रोपटे, एक वटवृक्ष झाले असून कारगुडे परिवाराने ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यात सुद्धा मोठे यश मिळवले आहे. व्यवसाय कोणताही असो, त्यात विविध समस्यांचा सामना करावाच लागतो. जो या सर्व समस्यांचा सामना करत चालत राहतो, त्याला मात्र यश मिळाल्या शिवाय राहत नाही. बाळासाहेब कारगुडे यांना सुद्धा पुर्वी पासून विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यांनी कठिण काळात शांततेने निर्णय घेत, या समस्यातुन मार्ग काढला. आर्थिक परस्थिती असो किंवा कोरोनाचे संकट असो, कारगुडे यांनी त्यांचा सामना केला व आज त्यांनी हॉटेल व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. हॉटेल बळीराजावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यात बाळासाहेब कारगुडे, विठ्ठल कारगुडे, महादेव कारगुडे व त्यांच्या टिमला मोठे यश मिळाले आहे.

बी.व्ही.एम. बळीराजा अर्बन निधी लि.च्या माध्यमातुन युवकांना सक्षम करणार – बाळासाहेब कारगुडे

व्यवसाय करायचा असेल तर प्रथम युवकांना येणारी अडचण म्हणजे पैसाची, तारण ठेवण्यासाठी काहीच नसल्यामुळे अनेकांना इच्छा असून सुद्धा व्यवसाय करता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक युवकांना व्यवसायापासून दुर राहावे लागत आहे. यामुळे या युवकांना बळ देण्याची गरज खरोखरच निर्माण झालेली आहे. कारगुडे यांना सुद्धा व्यवसाय उभा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु त्यांनी या सर्व अडचणींवर मात करत व्यवसायात यश संपादन केलेले आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणींची जाणिव त्यांना असल्यामुळे त्यांनी आज पर्यंत अनेकांना उभे करण्यास मदतीचा हात दिलेला आहे. बी.व्ही.एम.बळीराजा अर्बन निधी लि.च्या माध्यमातुन सुद्धा ते येणाऱ्या काळात युवकांना उभे करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. त्यांच्या या पुढाकाराने सर्व सामान्य परिवारातील अनेक जण स्वत:च्या पायावर नक्कीच उभे राहतील यात शंका नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here