परळीत भाजपा व पंकजा मुंडेंना मोठा धक्का!

0
990

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांचा ना. जयंत पाटील , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

परळी प्रतिनिधी : स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. पंडितअण्णा मुंडे यांचे जुने व अत्यंत निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते व ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे.

माजी मंत्री पंकजाताई मुंडे व भाजपला यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी स्व. मुंडे साहेब व अण्णांचे सहकारी आज आपल्यासोबत आल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

या वेळी नामदेवराव आघाव यांच्यासह वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, अश्रूबा काळे, भाऊसाहेब घोडके, माऊली मुंडे, किसनराव शिनगारे, पांडुरंग काळे यांच्यासह सेवा सहकारी सोसायटी पांगरी चे महादेव मुंडे, महादेव सदाशिव मुंडे, मोहन गित्ते यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, ना. जयंत पाटील, ना. धनंजय मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी व्यासपीठावर आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या ताई सिरसाट, उपाध्यक्ष तथा रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली ताई चाकणकर, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कु. सक्षनाताई सलगर, यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here