चक्क पंकजा मुंडे व अमरसिंह पंडीत यांचा कारखाना काळ्या यादीत!

0
2915

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका
साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या काळ्या यादीत राज्यातील 44 कारखाने
मराठवाड्यातील 11 कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकविली किं वा फसवणूक के ल्याचे समोर आले  आहे.

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : साखर आयुक्तांकडून राज्यातील 44 साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे, म्हणजेच ब्लॅक लिस्टेड करण्यात आलंय. या काळ्या यादीमधील कारखान्यांमध्ये  पंकजा मुंडे व अमरसिंह पंडित यांच्या साखर कारखान्याचा समावेश आहे. हे  44 कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करत असल्याचं साखर आयुक्तांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर यावा. कोणत्या कारखान्याची खरी परिस्थिती काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी राज्यात प्रथमच कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गळीत हंगामासाठी तयार असलेल्या 190 कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे.

हे कारखाने वेळेत देतात पैसे

राज्यात सर्वाधिक 30 कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माढा येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, विठ्ठल कार्पोरेशन कारखाना(खासगी), बबनराव शिंदे साखर कारखाना (खासगी), विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (खासगी) एवढेच कारखाने शेतकऱ्यांना नियमित देणी देत असून 14 कारखान्यांवर देणी थकविल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. कोल्हापुरात एकाही कारखान्यावर लाल फु ली नसून सांगली, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी पाच, पुणे जिल्ह्यात दोन, उस्मानाबाद जिल्ह्यात पाच, अहमदनगर एक, तर नाशिक जिल्ह्यात तीन कारखान्यांवर लाल फु ली मारण्यात आली आहे. मराठवाड्यातील 11 कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकविली किं वा फसवणूक के ल्याचे समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची यादी खालील प्रमाणे
लोकमंगल ॲग्रो लोकमंगल शुगर्स
श्री विठ्ठल वेणूनगर
विठ्ठल रिफाइंड शुगर
सिद्धनाथ शुगर
गोकूळ माऊली शुगर
जयहिंद शुग (भीमा टाकळी)
गोकूळ शुगर्स
श्री. संत दामाजी कारखाना (मकाई भिलारवाडी)

पंकजा मुंडेंच्या कारखान्याचाही समावेश
याचप्रमाणे भाजपा नेत्या पंकजा मुंडेंशीसंबंधित वैद्यनाथ कारखान्याचाही (परळी) या यादीमध्ये समावेश आहे. तसेच जय भवानी गेवराई कारखान्याचाही या यादीमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातील किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज, लोहारामधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना त्याचप्रमाणे मंगरुळमधील कांचेश्‍वर शुगरचाही या काळ्या यादीतील कारखान्यांमध्ये समावेश करण्यात आलाय.
सांगली एसजीझेड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट, पैठणमधील शरद कारखाना, लातूरमधील पन्नगेश्‍वर शुगर, औसामधील श्री. साईबाबा शुगर आणि नंदुरबारमधील सातपुडा तापीचाही या यादीमध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here