बिग न्युज; 15 ऑगस्ट पासून निर्बंध शिथिल!

0
49

बीड जिल्ह्यातील नागरीकांना सुद्धा मिळणार दिलासा
रात्री दहा वाजे पर्यंत दुकाना सुरु ठेवण्यास परवानगी
धामिकस्थळे व सिनेमागृह पुढील आदेश आल्यानंतर सुरु होतील

हॉटेल, रेस्टोरंट्स 50 टक्के क्षमतेते रात्री दहा पर्यंत सुरु ठेवता येणार

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यातील कोव्हीडचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांना 15 ऑगस्ट पासून रात्री दहा पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली. परंतु मंदिरे अजून काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज घेण्यात आलेल्या निर्णयात राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, छोटे मोठे दुकाने यासह मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही. राज्यात नियम शिथिल केल्यामुळे राज्यातील नागरीकांसह बीडच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु सर्वांनाच कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here