शासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाचे झाले बाजारीकरण!

0
69

-शिक्षणाच्या नावाखाली संस्थाचालकांनी सुरु केला धंदा
-लाखो रुपये फिस भरुनही मिळेना दर्जदार शिक्षण
-पालकांच्या तक्रारी येऊनही दखल घेण्यात येईना
-खासगी संस्था चालकाच्या मनमानी कारभाराकडे कोण लक्ष देणार?
-प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्हाला हवे दर्जदार शिक्षण
-सरकारला खासगी संस्थाचालकांचा पुळका का?
-पालकांची लुट करणाऱ्या संस्थांवर कारवाई का होत नाही?
-तक्रारी येऊनही शिक्षण क्षेत्रातील अधिकारी गप्प का?
-आमच्या लेकरांना सक्षम बनवणारे शिक्षण कधी मिळणार
-शासनाचे शिक्षणाबाबतचे धोरण खासगी संस्था चालकांच्या फायद्याचे तर पालकांसाठी त्रासदायक

हे बदल करण्याची गरज!

प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार्यांसाठी शिक्षण हमीपत्र ( )
सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण
प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक मागोवा
डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर शिक्षणात व व्यवस्थापनात
शिक्षकी शिक्षण, प्रशिक्षण व निवड यात आमुलाग्र बदल
शिक्षणाचा आकृतीबंध मूलभूत बदलाची गरज
महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन आणि साहित्य निर्मिती महामंडळ
शालेय व्यवस्थापनाची सर्व धुरा मुख्याध्यापकाकडे; मुख्याध्यापकाला निर्णय स्वातंत्र्य
शिक्षण व्यवस्थापनात शिक्षण तज्ञांचा समावे
प्रत्येक जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाची मराठी प्राथमिक शाळा

जालींदर धांडे : संपादक

बीड : शिक्षण म्हणजे काय? प्रथम याचा अर्थ आम्हाला शिकण्याची गरज आहे. शिक्षण कसासाठी आवश्‍यक आहे याची प्रथम आम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे. आज आम्हाला जे शिक्षण दिले जाते, त्या शिक्षणातुन आम्ही किती सक्षम होणार आहोत, इतर देशात देण्यात येणारे शिक्षण व आपल्या देशात मिळणारे शिक्षण यात किती फरक झाला आहे हेही पाहणे गरजेचे बनले आहे. यासह इतर महत्वांच्या मुद्दांकडे सध्या आपल्याला पाहण्याची गरज बनली आहे. महाराष्ट्रात आमच्या लेकरांना चांगले दर्जदार शिक्षण हवे आहे, परंतु ते शिक्षण सर्व सामान्यांना सध्या मिळत नाही. खासगी शाळांनी शिक्षणांचा मांडलेला धंदा व त्याकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे राज्यात सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. सध्या मिळत असलेल्या शिक्षणातुन आमचे लेकरे खरच काय शिकत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरलेे आहे. सद्या राज्यात शिक्षणाबाबत विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासर्व बाबींकडे राज्य सरकारने लक्ष देत नाही, शिक्षण क्षेत्राला उर्जा देण्याची गरज आहे. परंतु राज्य सरकार शिक्षणाच्या बाबीतुन पळ काढत, शिक्षण क्षेत्राला खासगी संस्थांकडे देत शिक्षण क्षेत्रातुन मुक्त होऊ पाहत आहे.

सध्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी पालकांना लाखो रुपये मोजावे लागत आहे. एवढे करुनही येथील लेकरांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नाही. येथील काही शाळेत दर्जदार शिक्षक सुद्धा नाहीत. कोरोनाच्या काळात सुद्धा पैसासाठी खासगी शिक्षण संस्था पालकांना वेटीस धरत आहेत. कोरोनामुळे छोटे मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. यामुळे येथील सर्व सामान्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यात मुलांच्या शिक्षणासाठी लागणार पैसा कसा उपलब्ध करावा या चिंतेत पालकवर्ग आडकला आहे. त्यात पैसासाठी शाळेचे रोजच फोन, मॅसेज येतात. सरकारने खासगी संस्थांवर वेळीच योग्य ते निर्बंध लावण्याची गरज आहे. यासह सर्वांना मोफत शिक्षण द्यावे तेही दर्जदार शिक्षण असावे, यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षण घेणारे लेकरे म्हणजे उद्याचे महाराष्ट्राचे भविष्य आहे. त्या भविष्यासाठी आता आपल्या सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्यात मोफत शिक्षण मिळाले तर राज्यातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. यासाठी आता राज्य सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील सर्वसामान्य वर्गाने पुढे येण्याची गरज आहे.

चौकट

शिक्षणाचा हेतू मुलाला आपल्या पायावर उभे करणे असावा

प्राथमिक शिक्षणाचा हेतू हा राज्यातील प्रत्येक मुलाला आपल्या पायावर उभे करणे, त्याचबरोबर नवीन युगाचा स्वीकार करून आपले योगदान देता यावे यासाठी त्याला तयार करणे हा असायला हवा. आपल्या मुलांना आपल्या पायांवर उभे राहता यावे, पैसे कमवण्याची अडचण त्यांना कधी येऊ नये, स्पर्धेत त्यांचा निभाव उत्तमपणे लागावा. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि सुखाचे, समाधानाचे जीवन त्यांनी जगावे. त्यांचे व्यक्तीमत्व घडावे, त्यांच्यात असलेल्या कला-गुणांना वाव मिळावा, ते अधिक फुलवता यावेत. सामाजिक जीवनात आपल्या मुलांना मुक्तपणे सहभागी होता यावे, सार्वजनिक आयुष्यात आपले योगदान देऊन त्यांनी भरीव कामगिरी करावी मग ते कुठल्याही क्षेत्रात का असेना. आधुनिक जगाला सामोरे जाण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये असावी, किंबहुना आधुनिक जगातील सुख-सोयींचा लाभ त्यांनी करून घ्यावा व त्यामुळे त्यांची भरभराट व्हावी. चांगले आई, वडील, भावंड बनावे, आपल्या कुटूंबातल्या नात्यांमधला ओलावा आणि प्रेम वृद्धिगत करावे. चांगले नागरिक व्हावे, आपल्या प्रदेशाविषयी, समाजाविषयी आपलेपणाची आणि अभिमानाची भावना कायम बाळगावी.

आम्हाला शिक्षण यासाठी हवेय!

चार पैसे कमवता आले म्हणजे माणूस आपल्या पायावर उभा राहिला एवढे पुरेसे नाही. मानवी समाजाचे ध्येय फक्त पैसा कमावणे, आपली उपजीविका मिळवणे एवढेच नाही तर आपल्या सर्व क्षमतांनी जीवनाचा संपूर्ण आनंद घेणे हे होय. मानवी जीवन समृद्ध, संपृक्त जीवन जगण्यातून परिपूर्ण होते. आपले कुटूंब, नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्या सोबत घालवलेला वेळ प्रत्येकाला समाधान देतो. कला-साहित्यातून मनुष्य अभिव्यक्ती साधतो. आपले छंद जोपासता यावेत, समाज जीवनात सहभागी होता यावे, एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावता यावे असे होण्याऐवजी आपण आज अधिकच व्यस्त आणि त्रस्त झालेले दिसतो.

मातॄभाषा राखून उत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी भाषेचे शिक्षण आम्हाला हवे!

आज इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा व व्यवहाराची भाषा म्हणून मानली जाते. ती विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्‍यक आहे ह्याबद्दल दुमत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवगत झाल्यामुळे पुढील आयुष्यात ते यशस्वीपणे स्पर्धेत उतरू शकतील ही अपेक्षाही रास्त आहे. यासाठी शिक्षणाचे माध्यम न बदलता इंग्रजी भाषा उत्तमरितीने शिकवली पाहिजे. हेच अधिक योग्य आहे, शिक्षण शास्त्राला धरून आहे.

पालकांचा सेमी-इंग्रजीकडे होणारा कल हा माहितीअभावी व गैरसमजुतीमुळे आहे असेच म्हणावे लागेल. आपण हे समजून घेतले पाहिजे व गरज पडल्यास पालकांचे प्रबोधन केले पाहिजे. शासनाने ह्याअगोदरच पहिलीपासून इंग्रजी शिकवणे अनिवार्य केले आहे. खर म्हणजे मातृभाषेची लिपी शिकताना, मातृभाषेतून लेखन-वाचनाचा पाया घालताना दुसर्याव भाषेचे शिक्षण घेणे हा अडसर ठरू शकतो असे भाषा-शिक्षण शास्त्र सांगते

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here