4085 अहवालात 188 पॉझिटिव्ह!

0
55

आष्टी व बीड तालुक्यात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कोरोना रुग्ण संख्या जिल्ह्यात खाली येऊन स्थिरावलेली दिसत आहे. जिल्ह्यात 100 ते 200 रुग्ण दिवसाकाठी वाढत आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात 188 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आष्टी तालुका व बीड तालुक्यात जास्त रुग्ण वाढलेले आहेत.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4085 अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाला यात 3897 अहवाल निगेटिव्ह तर 188 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 06, आष्टी 81, बीड 30, धारुर 06, गेवराई 21, केज 15, माजलगाव 02, पाटोदा 17, शिरुर 05, वडवणी 05 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे परत चिंता वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन नागरीकांनी कोरोनाला हरवण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here