4224 अहवालात 155 अहवाल पॉझिटिव्ह

0
63

पाच तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. आज प्राप्त झालेल्या 4224 अहवाला पैकी 155 अहवाल पॉझिटिव्ह आले तर 4069 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे बीडकरांना दिलासा मिळत आहे. तरीही नागरीकांनी अजुन काही दिवस सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 4224 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाले. यात 155 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. बीड 34, आष्टी 25, केज 23, गेवराई 15, अंबजोगाई 08, धारुर 06, माजलगाव 15, परळी 04, पाटोदा 06, शिरुर 09, वडवणी 10 असे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here