४५ वर्षे वय व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू

0
40

बीड जिल्ह्यात सध्या ४५ वर्षे वय व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रावर विनाकारण जास्त गर्दी होऊ नये व लसीकरण प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी नागरिकांना http://ezee.live/Beed-Covid19-Registration या लिंकवर नोंदणी करून टोकन नंबर प्राप्त करून घ्यावा व लसीकरणाला येणेबाबत SMS अथवा WhatsApp संदेश आल्यावरच लसीकरण करण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या राज्य शासनाच्या सूचनेनुसार सध्या स्थगित करण्यात आलेले आहे. या वयोगटातील व्यक्तींचे appointment शिवाय लसीकरण होणार असल्याबाबत बातम्या viral झालेल्या आहेत परंतु याबाबत राज्य शासन अथवा केंद्र शासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सुचना अद्याप प्राप्त नाहीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here