घरगुती वादातून माय-लेकींनी केले विष प्राशन; एकीवर उपचार सुरू तर आईचा मृत्यू

0
63

खुलताबाद ( औरंगाबाद ) : तालुक्यातील पळसवाडी येथे घरगुती वादातून आईने दोन मुलींना विष पाजून स्वत: विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना पळसवडी येथे शनिवारी ( दि.२२ ) सकाळी सातवाजेच्या सुमारास उघडकीस आली. यात आई व एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पळसवाडी येथील जनाबाई आन्ना मंदाडे ( ६५ ) या विवाहीतेने राधाबाई मनोज आढाव ( ३५, विवाहित) व हिराबाई आन्ना मंदाडे ( ४०,अविवाहीत) या मुलींना आज सकाळी साडेसहा वाजता पळसवाडी शिवारातील गट क्रंमाक २७६ मधील आपल्या शेतात नेऊन घरगुती कारणाने दोन्ही मुलींना विष पाजून स्वत: विषप्राशन केले.

विषप्राशन केल्यानंतर सदरील तिन्ही महिला बेशुध्द अवस्थेत पडलेल्या गावातील ज्ञानेश्वर म्हसरूप यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ माहिती उपसरपंच सोमनाथ ठेंगडे यांना दिली. उपसरपंच ठेंगडे यांनी घटनेबाबत खुलताबाद पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना माहिती दिली.

घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असता जनाबाई मंदाडे व राधाबाई मनोज आढाव यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. तर हिराबाई आन्ना मंदाडे हालचाल करीत असल्याने त्यांना वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी हलविण्यात आले. मंदाडे कुंटूबिय अत्यंत गरीब असून मोलमजुरी व शेळीपालन करून उदरनिर्वाह करतात.

या घटनेबाबत माहिती घेतली असता राधाबाई  मनोज आढाव हि गेल्या आठ दहा वर्षांपासून माहेरी पळसवाडीत राहते. तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबध ठेवल्याने ती पाच महिन्याची गर्भवती होती. या बदनामीच्या भीतीपोटी आईनेच आपल्या मुलींना विष पाजले असावे अशी चर्चा गावात आहे. उपचार सुरू असलेली हिराबाई मंदाडे ही भोळसर आहे. आपल्यापाठीमागे भोळसर लेकीचे काय होईल म्हणून तिला ही विष पाजले पंरतू ती यातून वाचली आहे.

दोन्ही मायलेकीचे मृतदेह वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी अद्याप खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here