रुग्ण संख्या कमी करण्यासाठी कोरोना काळात प्रशासनाला मदत करण्याची वेळ

0
71

 अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) कोरोणाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक झालेले आहे. साखळी तोडण्यासाठी जनतेने शिस्त पाळणे आवश्यक असून शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी प्रशासनाच्या बरोबर राहून काम करण्याची वेळ आली आहे, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

लोकांच्या अडचणी असंख्य आहेत. गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोरोना महामारी वर चर्चा होत आहे. त्यावर उपाय शोधले जात आहेत. लॉक डाऊन सारखे प्रकार यातूनच पुढे आले आहे. मात्र कोरोणाची ही समस्या सुटायला तयार नाही. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यापेक्षाही जास्त सरकार आणि जनता त्रस्त आहे.

ही बाब देशातल्या कोणत्याही एका सरकारची नसून त्या-त्या राज्यांबरोबर केंद्र सरकार देखील या समस्यासाठी आणि त्यावर उपाय योजना साठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही एका सरकारला दोष देता येत नाही. जिल्हा प्रशासन देखील आपापल्या पातळीवर सर्वत्र काम करत आहेत. मात्र हे संकट कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे.

सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे. लॉक डाऊन सारखे प्रकार जनतेने किती दिवस सहन करायचे ? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र जर एखाद्या आजारावर उपचार लवकर होत नसेल, मराठवाड्यात दररोज वीस-तीस रुग्ण प्रत्येक जिल्ह्यात एका दिवसात दगावत असतील, तर ही बाब जनतेने गांभीर्याने घ्यायला हवी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला वैयक्तिक पातळीवर काय काम करता येईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

महसूल, पोलीस, ग्राम विकास, आरोग्य, नगर पंचायती वगैरे प्रकारची यंत्रणा आपापल्या पातळीवर काम करत आहे. सध्या खडतर परिस्थिती मध्ये या सर्व प्रशासना बरोबर राहून काम करणं आवश्यक झालेला आहे. प्रशासनाला प्रत्येक नागरिकांनी मदत केली तर कोरोणाचीही साखळी अल्प कालावधीमध्ये तुटू शकते, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

लॉक डाऊन मुळे जनता त्रस्त आहे. ही बाब सर्वांना मान्य आहे. कोणीही घरात बसू शकत नाही. मात्र साखळी तोडण्यासाठी लोकांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरून सरकारचे नियम पाळले, एकमेकांमध्ये अंतर ठेवून वावरलं, तर कोरोना लवकर आटोक्यात येईल, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here