कोरोना अपडेट: जिल्ह्यात आज पण मोठा उद्रेक!

0
1311

अंबाजोगाई, बीड, परळी तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण वाढत असुन आज जिल्ह्यात तब्बल १०१८ एवढे रुग्ण वाढले. अंबाजोगाई व बीड तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. वाढती रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे जिल्ह्या प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या ४११८ अहवालापैकी ३१६५ निगेटिव्ह आले तर १०१८ पाॅझिटिव्ह आले.यात अंबाजोगाई २४३, आष्टी ९८, बीड २१६, धारुर २८, गेवराई ५०, केज ११९, माजलगाव ३४, परळी १४०, पाटोदा ५६, शिरुर २०, वडवणी १४ असे रुग्ण जिल्ह्यात आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here