बीडसह जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट!

0
3514
लॉकडाऊन उठले मात्र बीडकरांनो आता काळजी घ्या
प्रारंभ वृत्तसेवा
जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन उठवण्यात आले असले तरीही कोरोना मात्र लॉक झालेला नाही. आज जिल्ह्यात तब्बल 575 नव्या रुग्णांची भर पडली. यात बीड व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील आकडेवारी वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला असून हा ताण कमी करण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2255 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 1680 निगेटिव्ह तर 575 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. यात बीड-150, अंबाजोगाई-127, आष्टी-80, धारूर-11, गेवराई-11, केज-50, माजलगाव-35, परळी-48, पाटोदा-29, शिरूर-24, वडवणी-3 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. आजचा आकडा हा सर्वात मोठा आकडा असून अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता खबरदारी म्हणून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करत कोरोनाला हरवण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here