चिंताजनक: आज जिल्ह्यात कोरोनाचा मोठा आकडा!

0
2009

बीड, अंबाजोगाई तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : आज जिल्ह्यात लॉकडाऊनचा दहावा दिवस असून जिल्ह्यात परत लॉकडाऊन लावायचा की नाही या अनुशंगाने जिल्हाधिकारी आज निर्णय घेणार आहेत, परंतु आज जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 486 वर गेला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता बीड जिल्ह्याची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2959 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2473 रिपोर्ट निगेटिव्ह तर 486 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. यात बीड-120, अंबाजोगाई-107, आष्टी-57, धारूर-8, गेवराई-30, केज-34, माजलगाव-37, परळी-43, पाटोदा-26, शिरूर-15, वडवणी-9 असे रुग्ण जिल्हाभरात आढळून आले. आतापर्यंतच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर आजची रुग्णसंख्या ही सर्वात जास्त असून यापुढे जिल्ह्यात कोरोना आकडेवारी कशी रोखायची हा प्रश्‍न आरोग्यविभागासमोर पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here