माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश

0
68

बीड शहरातून जाणारा रस्ता लवकरच होणार- नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी
कुठलीही योजना अथवा कुठल्याही एखाद्या प्रकल्पास मंजुरी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात ही कामे केवळ एका भेटीने किंवा एका पत्राने होत नसतात कोल्हारवाडी ते जिरेवाडी हा धुळे येडशी सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग जोडला गेलेला बीड शहरातून जाणारा रस्ता आहे या रस्त्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रदीर्घ प्रयत्न केल्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून यासाठी 18.50 कोटी रुपये मंजूर झाले आहेत यातून बीड शहरातून जाणारा हा रस्ता सिमेंट काँक्रेट चा होणार असून उर्वरित रस्ता हा डांबरीकरणाचा केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

धुळे येडशी सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्यानंतर शहरातून जाणारा कोल्हारवाडी ते जिरेवाडी हा रस्ता देखील याच कामातून व्हावा यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे पालकमंत्री असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते गेल्या आठ ते दहा वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते मात्र 12 किलोमीटरचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच ग्राह्य धरला गेला होता त्यामुळे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निधी देण्यास नकार दिला होता त्याच वेळी पालकमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर यांनी ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आणि यासाठी नागपूर मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जवळपास दहा वेळा बैठकाही घेण्यात आल्या नगरपालिकेच्या वतीने देखील या रस्त्याच्या कामात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी आपण केली होती या रस्त्याचे काम होत असतानाच चौसाळा गेवराई आणि बीड शहरातून जाणाऱ्या बायपास साठी देखील गडकरी यांच्या बैठकीत आग्रह धरला तेव्हाच मंत्री नितिन गडकरी यांनी यास मंजुरी दिली असून तेव्हाच डीपीआर सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तेव्हा हैदराबाद येथील एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे, डीपीआर मध्ये बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी 50 कोटी गेवराईतुन जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 कोटी आणि चौसाळ्यातून जाणाऱ्या रस्त्यासाठी 5 कोटी असा प्रस्ताव दाखल करण्यात आला मात्र हे करत असतानाच मध्यंतरी निवडणुका लागल्या आणि काम खोळंबले त्यानंतरही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रहाची मागणी केली त्यामुळेच हा रस्ता मंजूर झाला असून अण्णांनी केलेला पाठपुरावा, प्रयत्न आणि दिलेला वेळ शेवटी कामी आला केवळ श्रेय घेण्यासाठीच स्थानिक आमदाराने पत्रकबाजी करून बीडकरांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, केवळ एक पत्र देऊन किंवा बातमी देऊन अशी कामे होत नसतात हे आता बीडच्या जनतेलाही माहीत झाले आहे यासाठी प्रदीर्घ पाठपुरावा केल्यानंतरच हे यश मिळाले असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे तसेच केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचेही बीड करांच्या वतीने आभार मानले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here