सलग दुसऱ्यांना राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी

0
9

मुंबई : भाजपचे नेते तथा आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोधी निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ही निवड करण्यात आली. या निवडीमुळे राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची शपथ घेणारे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

राहुल नार्वेकरांचा अल्पपरिचय

राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

यानंतर आता झालेल्या २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here