लोकसभेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच.

0
61
CM Eknath Shinde, Ajit Pawar, Dept. CM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde, Ajit Pawar, Dept. CM Devendra Fadnavis

शिंदे गटाचा 22 जागांवर दावा.

मुंबई (Mumbai) : सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. एनडीए (NDA) विरुद्ध इंडिया (India) असा सरळ सामना होईल. यात एनडीएचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील महायुती मध्ये भाजप(BJP) सोबत शिवसेना(Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार(Ajit Pawar) गट सहभागी आहे. महायुतीत आतापासूनच जागेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाने 48 पैकी 22 जागांवर शिदे गटाचा दावा केल्याने भविष्यात महायुतीत जागांसाठी असलेली ही स्पर्धा अधिक प्रकर्षाने जाणवणार असल्याचे दिसत आहे.

22 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचे राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी म्हटले आहे. उर्वरित जागांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. सोमवारी वर्षा बंगल्यावर खासदारांची बैठक झाली. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सुद्धा आहे. भाजपाने महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्य भाजपासाठी खूप महत्त्वाची आहेत.
शिवसेनेतर्फे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यात आली होती. त्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. शिवसेनेने 22 जागांवर निवडणूक लढवली होती. या बैठकीला सर्व 13 खासदार उपस्थित होते असे राहुल शेवाळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here