आ. विक्रम काळेंवर मराठवाड्यातील शिक्षक नाराज;मतदानातुन नाराजगी दिसणार!

0
87

पक्षातील गटबाजी काळेंसाठी ठरणार घातक!

प्रदीप सोळुंके यांना शिक्षकांचा मिळतोय प्रतिसाद
महाविकास आघाडीतील गटबाजीचा भाजपला मिळू शकतो फायदा
बीड जिल्हा ठिकठिकाणी काळेंना मिळते ना पसंती
अनेक संस्थाचालक आ.विक्रम काळेंवर नाराज

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मराठवाडा शिक्षक मतदार संघातुन सलग तीन वेळा आमदार होणारे विक्रम काळे हे चौथ्या वेळेस मराठवाडा शिक्षक मतदार संघातुन निवडणूक लढवत आहेत. परंतू काळेंना ही निवडणूक माञ जड जाणारा असून त्यांना बीड जिल्ह्यातील शिक्षक माञ ना पसंती देत आहेत. तसेच जिल्ह्यातील काही संस्थाचालक सुद्धा काळेंवर उघड उघड नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मतदानासाठी तीन दिवस शिल्लक असून या तीन दिवसांमध्ये शिक्षकांना आपल्याकडे खेचण्याचा केवीळवाणा प्रयत्न आमदार विक्रम काळे करताना दिसतायेत मात्र यावेळेस त्यांच्यासाठी ही निवडणूक जड बनली असून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातुन त्यांना ना पसंती मिळू लागले आहे. त्यांच्याच पक्षातील प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करत या निवडणुकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते सुद्धा जोमात प्रचार करताना दिसतायेत. या बंडखोरीचा सोळुंके व भाजपाला फायदा होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांना शिक्षक पसंती देत आहेत. यामुळे आमदार विक्रम काळेंच्या अडचणी निवडणूक जसजशी जवळ येते तस तसा वाढू लागल्या आहेत. मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी २९ जानेवारीला मतदान होत असून मतदानासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. राहिलेल्या तीन दिवसांमध्ये शिक्षकांना आपल्याकडे वळवण्याचा आमदार विक्रम काळे प्रयत्न करत असले तरीही त्यांचा हा प्रयत्न या वेळेस मात्र व्यर्थ जाणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सलग तीन वेळा येथील शिक्षकांनी आमदार विक्रम काळे यांना आमदार केले, परंतु आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. याचाच तोटा त्यांना या निवडणुकीत होणार आहे. बीड जिल्ह्यातून त्यांना ठीक ठिकाणी ना पसंती मिळताना दिसते. तसेच काही संस्थाचालक सुद्धा काळेंवर नाराज झाले असून त्यांची नाराजगी मतदानातून दिसणार आहे.

प्रदीप सोळुंके व भाजपाला यावेळेस मिळणार संधी!

मराठवाडा शिक्षक मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार होणारे विक्रम काळे ह्यावेळेस चौथ्यांदा निवडणूक लढवताना दिसतायेत, परंतु त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांच्या प्रश्न कडे केलेले दुर्लक्ष यावेळेस त्यांच्यासाठी घातक बनले आहे. यामुळे यावेळेस प्रदीप सोळुंके व भाजपाला याचा फायदा होणार असल्याचे चित्र मराठवाड्यात निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here