गुगलपेवरून 56 हजार लंपास; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

0
28

बीड । प्रतिनिधी : दिवसेंदिवस ऑनलाईन लुटीचे प्रकार वाढत असून त्यात भर पडताना दिसत आहे. गुगलपे वरून 56 हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाभाऊ दिनकर पानगुडे (वय 42) व्यवसाय शेती यांच्या खात्यावरून सतत थोडी थोडी रक्कम काढून अशी एकूण 56 हजाराची रक्कम अनोळखी व्यक्तीने अप्रमाणिकपणे काढून लंपास केले. पानगुडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश खरसाने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here