५० हजाराची लाच मागणारे दोघे जेरबंद;पोलीस दलात खळबळ

0
31

औरंगाबाद एसीबीची बीड शहरात कारवाई

प्रारंभ वृत्तसेवा

Beed : विनयभंग गुन्हे प्रकरणात दोन पोलीसांनी तक्रारदाराला ५० हजाराची लाच मागितली होती. यातील दहा हजाराची लाच घेताना सोमवारी (ता. पाच) सायंकाळी दोघांना एसीबीने रंगेहात पकडल. या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

संबंधित तक्रारदाराला विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. यातील दहा हजाराची रक्कम आज देण्याचे फायनल झाल्यानंतर औरंगाबाद एसीबीने बीड शहरात सापळा लावला होता. शहरातील बस स्टॅंड परिसरात शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर यांना दहा हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या दोघांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here