खा. रजनीताई पाटील यांची काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या सदस्यपदी नियुक्ती !

0
78

केज प्रतिनिधी:  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीत देखील बदल करण्यात आले आहेत. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील यांना देखील स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षात आजही लोकशाही पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो व या पद्धतीनेच मल्लिकार्जुन खर्गे हे निवडून आले आहेत. त्यांनी नुकताच अध्यक्ष पदाचा पदभार घेतला व देशातून प्रमुख काँग्रेस नेत्यांची एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेच्या कलम 15(B) नुसार, काँग्रेस अध्यक्षांनी सुकाणू समितीची स्थापना केली आहे व ही समितीच काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काम करेल असेही म्हटले आहे. या समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. रजनीताई पाटील यांची देखील वर्णी लागली आहे.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या गुड बुक मध्ये रजनीताई पाटील !
पक्षाशी व नेतृत्वाशी एकनिष्ठ असलेल्या रजनीताई यांना पक्षाने नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला असून मागील दहा वर्षांपासून रजनीताई पाटील ह्या गांधी परिवाराच्या अगदी जवळीक असून त्यांच्यावर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यामुळे रजनीताई पाटील ह्या मराठवाड्यातून एकमेव नेत्या आहेत त्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या गुडबुक मध्ये असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here