प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आजपासून आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून आज पर्यंत त्यांचे दिल्ली दौरे चार पाच वेळेस झाले तरीही आज पर्यंत मंत्रीमंडळ विस्ताराला त्यांना मुहूर्त सापडलेना नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार चालवत असल्यामुळे राज्यात अनेकांनी कामे खोळंबली आहेत. परंतु या सर्व प्रश्नांकडे या दोघांचे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्लीतील नेत्यांची भेट घेतील. यादरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरतो का हे पाहण महत्वाचं आहे.