गेवराईत पाच पैकी चार ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

0
38

अमरसिंह पंडित यांची ग्रामीण भागात मजबूत पकड

गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील पाचेगाव, सिरसमार्ग, दिमाखवाडी, जयराम तांडा आणि वसंत नगर तांडा या पाच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच पैकी चार ग्राम पंचायती विजयी झाल्या आहेत. यामध्ये पाचेगाव, सिरसमार्ग, दिमाखवाडी आणि जयराम तांडा या ग्राम पंचायतीवर माजी आ. अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयामुळे ग्रामीण भागात अमरसिंह पंडित यांची मजबुत पकड असल्याचे सिद्ध झाले आहे.

गेवराई तालुक्यातील पाचेगाव आणि सिरसमार्ग या दोन मोठया गट आणि गण असलेल्या ग्राम पंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्या दोन्ही ग्राम पंचायतीवर अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनल विजयी झाले आहेत. सिरसमार्ग ग्राम पंचायत यापूर्वी भाजपच्या ताब्यात होती, मात्र सर्व सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात असतानाही गावात विकास कामे झाली नाहीत म्हणूनच मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने कौल दिल्याचे बोलले जात आहे.

सिरसमार्ग ग्रामपंचायतींमध्ये प्रभाग क्रमांक तीन व चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संतुआई ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार सौ. मिनाक्षी सोमेश्वर गचांडे, सौ. राजकन्या लक्ष्मण कोळेकर, सौ. दैवशाला नारायण कोळेकर, सौ. सिमा सुरेश मार्कड, विनोद नवनाथ चव्हाण, नितीन रामभाऊ लिंगे हे सहा उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. आकरा पैकी सहा जागा जिंकून सिरसमार्ग ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले आहे.

पाचेगांव ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक एक मधून सोमनाथ बाबुराव बनसोडे, रिहाना बाबु सय्यद, शिवकन्या नारायण हाटवटे तर प्रभाग क्रमांक दोन मधून बाळु सावळाराम प्रधान, वैशाली रामेश्वर आडे हे विजयी झाले. नऊ पैकी पाच जागेवर विजय मिळवून पाचेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीने ताब्यात घेतली.

जयराम तांडा ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून श्रीराम भानुदास राठोड, भागुबाई कृष्णा जाधव तर प्रभाग क्रमांक दोन मधून विष्णू रामभाऊ राठोड, बहिणाबाई सुंदर राठोड, पुजा आकाश राठोड आणि प्रभाग क्रमांक तीन मधून सिमा संजय राठोड आणि प्रभु भालचंद्र आडे हे सात उमेदवार विजयी झाले, ही ग्राम पंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष म्हणून लढविली होती.

दिमाखवाडी ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून अनिता तुकाराम मोरे, विजेश जानु जाधव, शामराव भिमराव अलगुडे, ज्ञानेश्वर भगवान सव्वासे हे विजयी झाले.

ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी आ.अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित उमेदवार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्यात भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात ग्रामीण मतदारांनी कौल दिल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here