शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई शहरात टिपरे महोत्सावाचे आयोजन

0
32

नोंदणी करण्याचे आयोजक विजयसिंह पंडित यांचे आवाहन

गेवराई प्रतिनिधी : टिपरे या लोककलेचे गेवराईशी अतुट नाते आहे, या लोककलेची परंपरा टिकावी म्हणून शारदा प्रतिष्ठानकडून
नापंचमीच्या सणानिमित्त टिपरे महोत्सवाचे आयोजन दि.३ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. टिपरे लोककलेसह विविध कलाकारांना या उत्सवात आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळणार आहे. गेवराईची लोककला टिकावी आणि नविन पिढीमध्ये रुजावी यासाठी जाणीवपूर्वक अनेक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त लोककलावंत आणि संघांनी आपला सहभाग निश्चित करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

नागपंचमीच्यानिमित्ताने टिपरे आणि सोंग या कलाविष्काराचे आयोजन गेवराई शहरात अनेक वर्षांपासून केले जाते. वास्तविक गेवराईची लोककला म्हणून या कलाविष्काराकडे पाहिले जाते. लोककलेचा हा वारसा पुढच्या पिढीला कळावा आणि त्याचे जतन व्हावे या उद्देशाने बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सन २०१९ पासून गेवराई शहरात नेत्रदिपक टिपरे महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र कोविड संक्रमणाच्या कठिण परिस्थितीमुळे मागील दोन वर्षे हा महोत्सव आयोजित होवू शकला नाही. यावर्षी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई शहरात नेत्रदिपक टिपरे महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि.३ ऑगस्ट रोजी सायं.६ वाजता, बाजार तळ, गेवराई येथे करण्यात येणार आहे. या महोत्सवात प्रथम संघास रु.१५,०००/- , द्वितीय संघास रु.१०,०००/- व तृतीय संघास रु.५०००/- रोख व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय पंचमीनिमित्ताने सोंग घेण्याची परंपरा असल्याने उत्कृष्ट सोंग घेणाऱ्या कलावंतांना सुध्दा रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील उत्कृष्ट वादन करणाऱ्या कलावंतांना सुध्दा सन्मानचिन्ह देण्यात येणार असून भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. कलेच्या व या परंपरेच्या प्रोत्साहनासाठी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानच्यावतीने विजयसिंह पंडित यांनी दिली.

याप्रसंगी संस्कृती ग्रुप, बीड या राज्यभरात गाजत असलेल्या कलावंतांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. गेवराईची ही टिपरे स्पर्धा पाहता यावी म्हणून महिलांची विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. टिपरे महोत्सवात संघांची नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्र. 7588635112 व 9420874578 वर संपर्क करावा असे आवाहन करून गेवराई शहराची अस्मिता व परंपरा जोपासण्यासाठी जास्तीत जास्त संघांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here