पुणे प्रतिनिधी : दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले,” असं म्हणत एका महिला पत्रकाराने शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर उत्तर देताना पवार यांनी, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” उत्तर दिलं. त्यानंतर हसत दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या पत्रकारांकडे पाहत, “त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं पवार म्हणाले.