राज्यसभेतील कामकाजाचा 57 टक्के वेळ वाया!

0
37

नवी दिल्ली : “राज्यसभेचे सभापती म्हणून हे माझे 14 वे आणि अखेरचे सत्र (अधिवेशन) असून पाच वर्षांमध्ये मला खूप शिकायला मिळाले. गेल्या 13 सत्रांमध्ये नियोजित 248 दिवसांपैकी फक्त 141 दिवस कामकाज होऊ शकले. म्हणजे 57 टक्के कालावधी वाया गेला”, अशी खंत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अखेरचे संसदीय अधिवेशन आहे. 10 ऑगस्ट रोजी नायडू यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, नायडू यांनी राज्यसभेत, ‘स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांतील हे शेवटचे अधिवेशन सदस्यांनी अविस्मणीय करावे’, असे आवाहन केले. मात्र, नायडू ‘मन की बात’ वरिष्ठ सभागृहात बोलून दाखवत असतानाच, काँग्रेससह विरोधकांनी वरिष्ठ सभागृहामध्ये विविध मुद्दय़ांवरून सभापतींसमोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. महागाई तसेच, वस्तू व सेवा कराच्या मुद्दय़ांवरून प्रामुख्याने काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला. “काही सदस्य कामकाज होऊ द्यायचे नाही असा जणू पण करून सभागृहात येतात. शिवाय, सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुसाठी मतदान करण्यासाठीही जायचे आहे”, अशी नाराजी व्यक्त करत नायडूंनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले. लोकसभेतही सदस्यांना मतदानासाठी वेळ मिळावा यासाठी सभागृह 20 मिनिटांमध्ये तहकूब करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here