प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्यावतीने जल्लोषात स्वागत…!
बीड प्रतिनिधी – हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे अनुयायी व मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तथा ठाणे महानगर पालिकेचे मा.महापौर श्री. संजयजी मोरे हे दि. 16 जुलै 2022 रोजी बीड येथे आले असता त्यांनी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी संजयजी मोरे यांचे प्रा. सुरेश नवले मित्र मंडळाच्यावतीने फटाक्याची अतिषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या नावांची जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून संजयजी मोरे यांचा यथोचित सत्कार केला. अॅड.चंद्रकांत नवले यांनी आपले छोटेखानी मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की, मराठवाडयामध्ये सर्वप्रथम प्रा. सुरेश नवले मित्र मंडळानेच मा.ना.एकनाथराव शिंदे साहेबांच्या उठावाला जाहीरपणे समर्थन देवून त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. त्यांनी बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत करत असलेला त्यांच्या कार्याचा आढावा मा. संजय मोरे साहेबांसमोर मांडला. भविष्यात प्रा.सुरेश नवले मित्र मंडळ हे ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या पाठीशी कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभा राहील याची ग्वाही आपल्या मनोगतात व्यक्त केली. श्री. संजय मोरे यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी श्री. रोहित पाटील, अॅड.क्षीरसागर, मिहीर ठक्कर, मा.नगरसेवक श्री.सतीश देशमुख यांचाही प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना माजी शहर प्रमुख संजय नलावडे, उपशहर प्रमुख शहाजी गायकवाड, माजी शहर प्रमुख राकेश जाधव, विद्यार्थी सेनेचे मराठवाडा माजी संघटक कृष्ण वांगीकर, माजी तालुका प्रमुख आसाराम आमटे, श्रीमंत उबाळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल साळुंके, सुधीर थिगळे, कल्याणराव क्षीरसागर, श्रीधरराव उकांडे, प्रल्हादराव झुनगुरे, बाळासाहेब काळे, संभाजीराव नलावडे, बंडू घोलप, बाळासाहेब गोडसे, राजेंद्र ढवळे, रामचंद्र वीर, जगदीश तलरेजा, प्रभाकर जाधव, भटक्या विमुक्त संघटनेचे धनराज गायकवाड, संजय नवले, राजेश नवले, देव नवले, शिव खोसे, गणेश तांगडे, बीड दर्शनचे संचालक शिवाजीराव गायकवाड, हनुमंतराव गायकवाड, तुळशीराम सपकाळ, रवि सपकाळ, सचिन सुरवसे, रवि क्षीरसागर, दत्ता गुंजाळ, शंकर गायकवाड, बाजीराव गायकवाड, बंटी गायकवाड, निलेश थोरात, रोहन नवले, शिवम नाईकवाडे, नरेश शर्मा, शुभम घोलप, सागर खोबे, सर्वेश सोमाणी, पारस गायकवाड, विशाल गायकवाड, राहुल गायकवाड, सुयश वाघमारे, यश बियाळे, ऋषिकेश पिंपळे, राकेश नवले, समीर खान, उजेर खान, संकेत लांडे, शोयब सौदागर, साद पटेल, रितेश हानुवटे, नुमन कुरेशी, समर्थ आहेरकर, सहर्ष तुपे, शुभम गव्हाणे, अक्षय तांबे, ओंकार गुळभिले, रोहंशु तांबे, विवेक तांदळे, अवि कुलकर्णी, आकाश मोरे, अंकित जोशी, योगेश कुंभारकर, अक्षय फुलारे, प्रसाद बागडे, दिप पट्टेकर, सार्थक डामरे, अजय दुधाळ, श्रवण जोगदंड, व्यंकटेश पिल्ले, सुहास जाधव, कुणाल वारभवन, ऋषिकेश वडमारे, आशुतोष ढाकणे, विशाल रासकर, भगवानराव आहेर, रणवीर शिंदे, साहील ओव्हाळ, विक्की आडागळे, रोशन आमटे, अनिकेत मस्के, रितेश इगवे, प्रथमेश बागडे यांच्यासह शहरातील मित्र मंडळाचे जवळपास 250 ते 300 पदाधिकार्यांसह सदस्य उपस्थित होते.