मराठा आरक्षणासाठी  शिवसंग्रामचे धरणे आंदोलन!

0
44

राज्याभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलने  सुरु

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमदार विनायक मेटे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यात शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासह इतर प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित असून या सर्व प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आज राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्‍नांचे निवेदन देण्यात येणार आहे. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here