पंकजा मुंडे यांना राजकारणातुन संपूर्ण खतम करण्याचा हा डाव!

0
94

प्रारंभ वृत्तसेवा

राज्यातील भाजपाचे नेतेच करतायेत साहेबांच्या वारसांवर अन्याय

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्‍न पडला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे अशी शंका शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे. यासह राज्यातील भाजपाचे नेतेच मुंडे साहेंबांच्या लेकींवर अन्याय करत असल्याची चर्चा कार्यकर्त्यातुन होऊ लागली आहे.

गेल्या काही वर्षापासून बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पक्ष डावलताना दिसत आहेत. नुकताच केंद्रिय मंत्री मंडळात फेरबदल करण्यात आलेले आहेत. परंतु यात सुद्धा बीडच्या पालकमंत्री प्रीतम मुंडे यांना डावल्यात आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. “श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here