मोर्चा बीड मध्ये व हादरे राज्याला!

0
45
  • बीड मधुन धसांनी फोडली डरकाळी: मराठा आरक्षणासाठी पुन्हा मावळे रस्त्यावर
  • मुस्लिम बांधवांनी आमदार सुरेश धसांवर केली पुष्पवृष्टी
  • लहान भाऊ आला मोठ्या भावाच्या मदतीला
  • मुस्लिम बांधवांनी ठिक ठिकाणी केली पाण्याच्या सोय
  • कोरोनाच्या नावाखाली फक्त दोनच दिवसाचे अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव
  • हे सरकार जनतेचे नाही : आमदार सुरेश धस
  • लग्न आमच्या बरोबर व मंगळसुत्र दुसऱ्याचे म्हणत शिवसेनेवार धसांनी साधला निशाना
  • ह्या सरकारने मराठा समाजाची वाट लावली
  • भगव्या वादळाने शहर दणाणून गेले
  • मराठा आरक्षणासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले
  • जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मावळे मोर्चात सहभागी
  • मराठा आरक्षणचा प्रश्‍न आमदार सुरेश धस मार्गी लावतील : आर.टी.जिजा
  • आमदार सुरेश धस यांनी आदिवासी समाजाला न्याय दिला; माजी जि.प.अध्यक्षा मिराताई गांधले

प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न व इतर मागण्यांसाठी आज शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. आमदार सुरेश धस यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यतील मावळे या मोर्चासाठी दाखल झाले होते. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून ह्या मोर्चाची सुरुवात झाली माळवेस, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात भगवे झेंडे घेऊन मावळे मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यासह ठिक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यासह कारंजा रोड परिसरात मुस्लिम बांधवांनी आमदार सुरेश धस यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मोर्चा जिल्हाधिकारी परिसरात आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्व प्रथम सर्व मावळ्यांचे आभार मानत भाषणास सुरुवात केली. मराठा आरक्षणासह इतर मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तो पर्यंत माझा संघर्ष सुरु राहणार असून या सरकारने सर्व प्रश्‍न मार्गी लावावेत अशी मागणी यावेळी आमदार सुरेश धस यांनी केली. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, आर.टी.जिजा, बी.बी. जाधव, गंगाधर काळकुटे यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती होती.

 

मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांना तातडीने पिक कर्ज देण्यात यावेत, पिक विम्याच्या पॅटर्न उलटा चाललाय, यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, ऊतसोड मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा करावा, 66% भाववाढ देण्यात याव, कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा भव्य मोर्चा काढण्यात आला. आमदार सुरेश यांनी काढलेल्या मोर्चात जिल्हाभरातील मावळे यात सहभागी झाले होते.  मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. परंतु आज पर्यंत मराठा समाजाला यश आलेले नाही. यामुळे मराठा समाजातील युवकांचे यात मोठे नुकसान होत आहे. यासह इतरही समस्यांचा सामना मराठा समाजाला करावा लागत आहे. यासह जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सुद्धा अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी दुर करुन त्यांना तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे, ज्यांनी कोरोनाच्या काळात आपला जिव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्या त्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत घेण्यात यावे, पिक विमा बीड पॅटर्न उलटा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी विविध प्रश्‍नांना हात घातला. मराठा आरक्षणासह इतर मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

 

पुन्हा छोटा भाऊ आला मदतीला

2016 मध्ये ज्या प्रकारे मुस्लिम बांधवांनी मोर्चेकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. त्याच प्रकारे आज निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांसाठी मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यामुळे परत एखदा बीड मध्ये दोन्ही धर्मातील एकोपा पाहावयास मिळाल.

 

 

समाजासाठी व जिल्ह्यासाठी कायम सोबत ; आमदार लक्ष्मण पवार

मराठा आरक्षण धडक मोर्चात भाजपाचे गेवराई मतदार संघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण पवार यांनी सहभाग घेतला होता. भाषणा दरम्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या व जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्‍नांवर मला आवाज द्या, मी कायम सोबत आहे. यासह इतर प्रश्‍नांवर त्यांनी यावेळी लक्ष केंद्रीत केले होते. आमदार लक्ष्मण पवार हे मोर्चाच्या सुरुवाती पासून ते मोर्चा संपे पर्यंत उपस्थिती होते. यासह मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देताना सुद्धा ते हजर होते.

 

 

मुस्लिम बांधवांनी केली पुष्पवृष्टी

मराठा आरक्षण धडक मोर्चा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन प्रारंभ झाल्यानंतर माळवेस, बलभीम चौकातुन कारंजा रोडने येत असताना याठिकाणी मुस्लिम बांधवांनी आमदार सुरेश धसांवर फुलांची वर्षाव करत स्वागत केले. यावेळी हा सर्व परिससरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार सुरेश धस यांनी सर्व बांधवांचे आभार मानले.

लग्न आमच्या बरोबर व मंगळसुत्र दुसऱ्याचे : आमदार धस

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी थेट शिवसेनेवर निशाना साधला ते म्हणले लग्न एका बरोबर केले व मंगळसुत्र दुसऱ्याचे घातले. यासह त्यांनी राज्य सरकारच्या व जिल्हा प्रशासनाच्या कामचा चांगला आढावा घेतला. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्‍न उपस्थित केले. आमदार सुरेश धस यांनी मोर्चासाठी चोक नियोजन केले होते.

पोलीस प्रशासनाचे चोख नियोजन

सण असो किंवा नेत्यांचे दौरे किंवा मोर्चे पोलीस बांधव आपले काम चोक पणे निभावत असतात. आज शहरात पार पडलेल्या मराठा आरक्षण धडक मोर्चाच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दलाने चोक नियोजन केले होते. मोर्चाच्या मार्गावर जागो जागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक आर.राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोंर्चा शांततेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here