बीड जिल्ह्याला आता पर्यंत मिळाले 12 खासदार

0
37

सलग 15 वर्ष खासदार म्हणून निवडूण येण्याचा मान खासदार जयसिंगराव गायकवाड यांना
कै. केशरबाई क्षीरसागर यांना तीन वेळेस संधी
स्व.गोपीनाथ मुंडे यांना दोन वेळेस संधी
सर्वात जास्त भाजपा व काँग्रेस पक्षाला पसंती देणारा बीड जिल्हा
-राष्ट्रवादीला फक्त एकच संधी
राष्ट्रवादी एकाच उमेदवाराला संधी देत नसल्यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात अपयश

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हा हा विकासापासून खुप दुर आहे. आता पर्यंत जिल्ह्यांने अनेकांना खासदार पदी निवडूण दिलेले आहेत. परंतु आता पर्यंत जिल्ह्याच्या विकासाठी म्हणावे तसे कुणी पुढे आलेले नाही. 1952 पासून आता पर्यंत जिल्ह्याला 12 खासदार मिळालेले आहेत. यात सलग तीन वेळेस खासदार होण्याचा मान हा खासदार जयसिंगराव गायकवाड यांना मिळाला तर कै.केशरबाई क्षीरसागर सुद्धा तीन वेळेस खासदार राहीलेल्या आहेत. स्व.गोपीनाथ मुंडे सलग दोन वेळेस खासदार राहीलेले असून यानंंतर  सध्याच्या खासदार प्रितम मुंडे ह्या दोन  वेळेस सलग  खासदार झाल्या आहेत. बाकीच्या उमेदवारांना प्रत्येकी एक एक वेळेस बीड जिल्ह्यातील मतदारांनी संधी दिलेले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी सर्वांना समान संधी दिल्याचे या निवडीवरुन दिसून येत आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत सात सात वेळेस भाजपा व काँग्रेसला संधी दिलेली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणार बीड जिल्ह्यात काँग्रेस का संपली हे ही पाहणे गरजेचे बनले आहे. येथील मतदारांनी सर्वांना समान संधी दिली परंतु आता पर्यंत येथील विकास मात्र कुणीच केलेला नाही. यामुळे येणाऱ्या काळात विकास करणाऱ्या उमेदवारालाच येथील मतदार मतदान करणारा का? जुन्याच उमेदवरांना मतदान करणार हे येणारा काळाच ठरवेल.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वात्र ओळखला जातो. या जिल्ह्यातुन प्रत्येक वर्षी पाच ते सहा लाख मजुर ऊसतोडणीच्या कामाला परजिल्ह्यात, परराज्यात जातात, त्याठिकाणी सहा ते आठ महिने राहून आपल्या परिवाराची उपजिवीका भागवतात यासह येथील अर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे येथील युवक वर्गा मोठया प्रमाणात मोठ्या शहरात जाऊन रोजगार शोधत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कुटूंब पद्धत संपत चालेली आहे. जिल्ह्यात मोठ मोठे उद्योग धंदे  आले तर जिल्ह्यातील बेरोजगारांना काम मिळेल व त्यांना जिल्हा सोडून जाण्याची वेळ येणार नाही. परंतु जिल्ह्याचा विकास करावा यासाठी कुणी पुढे येताना दिसत नाही. येथील राजकीय नेते फक्त राजकारण करताना दिसतात. जिल्ह्याना सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा संसद मध्ये पाठवलेले आहे. परंतु संसद मध्ये जाऊन जिल्ह्याच्या विकासाठी कुणी कुणी पुढाकार घेतला यापेक्षा विकास कुणी केला हे ही पाहणे गरजेचे बनले आहे. यापुढे जिल्ह्याचा विकास करुन घ्यायचा असेल तर येथील मतदारांनी ज्यांना निवडून दिले आहे, त्यांच्याकडून बीड जिल्ह्याचा विकास करुन घेणे. आपण एकदा निवडूण दिले की, त्या उमेदवाराला काहीच विचारत नाही. यामुळे हे उमेदवार म्हणावा अशा विकास करत नाहीत. खरच जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर नागरीकांनी सर्तक राहून जिल्ह्याचा विकास करुन घ्यावा अशी वेळ सध्या निर्माण झाली आहे.


चौकट

वर्ष खासदार पक्ष
-1952 -श्री.बाबासाहेब परांजपे -काँग्रेस
-1957 -रखमाजी गावडे -काँग्रेस
-1962 -श्री द्वारकादासजी मंत्री -काँग्रेस
-1967 -श्री क्रांतीसिंह नाना पाटील -कम्युनिस्ट पक्ष
-1971 -श्री सयाजीराव पंडीत -काँग्रेस
-1977 -श्री गंगाधर बुरांडे -कम्युनिस्ट
-1980 -श्रीमती केशरबाई क्षीरसागर -काँग्रेस आय
-1984 -श्रीमती केशरबाई क्षीरसागर -काँग्रेस आय
-1989 -श्री बबनराव टाकणे – जनता दल
-1991 -श्रीमती केशरबाई क्षीरसागर -काँग्रेस आय
-1996 -श्रीमती रजनीताई पाटील -भाजपा
-1998 -श्री जयसिंगराव गायकवाड -भाजपा
-1999 -श्री जयसिंगराव गायकवाड -भाजपा
-2004 -श्री जयसिंगराव गायकवाड -राष्ट्रवादी
-2009 -श्री गोपीनाथराव मुंडे -भाजपा
-2014 -श्री गोपीनाथराव मुंडे -भाजपा
-2014 -श्रीमती प्रितम मुंडे (पोट-नि) -भाजपा
-2019 -श्रीमती प्रितम मुंडे -भाजपा


राष्ट्रवादी पक्ष सतत लोकसभेचे उमेदवार बदलत असल्यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात अपयश

बीड जिल्हा लोकसभा मतदार संघात 2004 पासून भाजपा पक्षाचे खासदार निवडूण येत आहेत. याच दरम्यान विरोधी पक्षाने नेहमीच वेगवेगळे उमेदवार दिलेले आहेत. यात 2004 राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळूंके यांना उमेदवारी दिली होती, 2009 ला माजी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली, 2014 ला राष्ट्रवादीने युवा नेते रमेश आडसकर यांना संधी दिली यानंतर 2019 ला राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना संधी दिली. दरवेळेस उमेदवार बदल्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश येत नसल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. राष्ट्रवादी पक्षाने एकच उमेदवार देऊन त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशीही मागणी जिल्ह्यातील मतदार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here