कोरोनाने बळी गेलेल्यांच्या कुटूंबियांना 4 लाख देणे अशक्य; केंद्र

0
47

प्रारंभ वृत्तसेवा

(20 जूनची आकडेवारी) देशात 3 लाख 86 हजार, 713 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

बीड : कोरोना बळी गेलेल्यांच्या कुटूबियांना चार लाखाची मदत देण्यात यावी अशा सुचना केंद्राने केल्या होत्या. यानंतर केंद्राने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून यात केंद्राने सांगितले आहे की, कोरोना मृत झालेल्यांच्या कुटूंबियांना चार लाखाची मदत देणे अशक्य आहे. करोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्राने आपली भूमिका मांडली.

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही, कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळी ठरलेल्यांनाच मदत करण्याची तरतूद आहे. जर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची म्हटलं, तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल. आणि एकूण खर्चही वाढू शकतो, असं केंद्रानं न्यायालयाला सांगितलं आहे.

“एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी करोनाबळींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासाठी वापरण्यात आला, तर करोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी, विविध अत्यावश्‍यक औषधी आणि पुरवठा साहित्यासाठी किंवा चक्रीवादळं आणि पूर परिस्थितीबद्दल मदत करण्यासंदर्भात राज्यांकडे पैसाच राहणार नाही. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेपलीकडची आहे,” केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here