24 तासात देशात दोन लाख 73 हजारांवर नव्या रुग्णांची भर

0
125

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : गेल्या दहा दिवसापासून देशात कोरोनाचा कहर झाला असून, गेल्या 24 तासात देशात दोन लाख 73 हजार 810 नव्या रुग्णांची भर पडली आहे. हा आकडा आज पर्यंतचा सर्वात मोठा आकडा असल्यामुळे आता देशाच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाची दुसरी लाट प्रथम महाराष्ट्रात सक्रीय झाल्यानंतर आता देशभरात सक्रिय होताना दिसत आहे. आता इतर राज्यात सुद्धा विविध कडक निमय लागू करण्यास त्या त्या राज्यांनी सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरात एक हजार 19 जणांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. यापुढे सर्वांनाच खबरदारी घेत वागावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here